वाशी तालुक्यातून अपहरण करण्यात आलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची दीड वर्षांनंतर सुखरूप सुटका करण्यात धाराशिव पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेला यश आले आहे. याप्रकरणी आरोपी सुनिल लक्ष्मण धोत्रे याला अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी ऊसतोड कामगार कुटुंबातील असून, १८ मार्च २०२४ रोजी रात्री दीडच्या सुमारास आरोपी सुनिल धोत्रे याने तिला अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेले होते. अशी माहिती वाशी पोलिसांच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी ६ वाजता दिली.