विरार येथील रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळून भीषण अशी दुर्घटना घडली असून एनडीआरएफ व बचाव पथकामार्फत ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. 14 नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विरार, नालासोपारा, वसई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असून तर सहा जणांवर उपचार सुरू आहेत.