मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल करून एका प्रकारे उद्धव ठाकरे यांचीच बाजू घेतली आहे. आज एका भाषणात बोलताना त्यांनी मतचोरी होत असल्याचं विधान केलंय. ‘मी केव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये, असं तुम्ही समजू नका. आपली मतं चोरली जात आहेत. मतांमध्ये गडबड आहे. त्यामुळेच आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागत आहेत.