कारंजा शहरातील जगदंबा कॉलनीमध्ये युवकाने राहत्या घरी खिडकीच्या घरीला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.. अमोल वसंत सरोदे वय 35 वर्ष राहणार जगदंबा कॉलनी असे मृतकाचे नाव आहे.. अमोलने घरातील खोलीचा दरवाजा मंगळवारी रात्री आतून बंद केला व ग्रीलच्या खिडकीला ओढणीने बांधून आत्महत्या केली बराच वेळ झाला म्हणून पत्नीने आवाज दिला असता खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे नातेवाईकांच्या मदतीने दार तोडले असता फाशी घेतलेले आढळून आले...