आज दि १३ स्पटेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास खुलताबाद उरूस व श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. हाफिज खलील चौक ते वेरुळ टी पॉइंट व ईदगाह परिसरात वाहतुकीची तीव्र कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. वाहतुक कोंडीच्या ठिकाणी स्थानिक पोलिसांचा अभाव जाणवत असल्याने वाहनधारकांत नाराजी पसरली आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी होमगार्ड करतांना दिसत आहे.