पालघर तालुक्यातील शिरगाव येथे बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. शिरगाव- उसबाव परिसरातील खाजण जमीन परिसरात बिबट्या वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. बिबट्याच्या पायाचे परिसरात आढळून आले असून बिबट्याचा वावर परिसरात असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.