भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर आज ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भंडारा शहरात दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी श्री गणेश उत्सवाचे औचित साधत भंडारा शहरातील विविध भागातील गणेश उत्सव मंडळांना भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येक गणेशोत्सव मंडळात विराजमान असलेल्या गणेशजींचे मनोभावे दर्शन घेतले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा येथील प्रभाग क्रमांक २, ३, ४ व ५ मधील विराजमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली व बाप्पाचे दर्शन घेतले.