मुंबईतील मराठा आंदोलनावर विखे पाटील यांचा इशारा : “गांधीगिरीने आंदोलनाला गालबोट लागू नये” नगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी होत असून, आंदोलक मुंबईत ठिकठिकाणी गांधीगिरी करत आहेत. मात्र, या गांधीगिरीच्या नावाखाली होणाऱ्या काही कृतींमुळे आंदोलनाची शालीनता आणि गांभीर्य धोक्यात येऊ शकते, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.