गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरुद्ध पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आज १ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठी कारवाई केली आहे. अहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा मद्दीगुडम येथे धाड टाकून पोलिसांनी देशी दारूच्या ७३० पेट्या आणि एक चारचाकी वाहन जप्त केले आहे.