नंदुरबार शहरातील रायसिंग पुरा परिसरात मारुती व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला मंडळ सदस्यांसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.