वर्धेतील रामनगर भागात एका भीषण अपघातामध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला येथील भगतसिंग चौकात दुपारी हा अपघात घडला.भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे दुचाकीवरील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ट्युशनहून परत येत असताना अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारादरम्यान, एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला दुसऱ्या गंभीर जखमी विद्यार्थ्यावर सावंगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे 29 ऑगस्ट रोजी रात्री10 वाजता पोलिसांनी सांगितले.