मांडवे बुद्रुक येथून पकडलेला वाळूचा ट्रॅक्टर पळवला संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे वाळू चोरून वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला. आरोपींनी अधिकाऱ्यांना दमदाटी करून तो पळवून नेला. या बाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की मांडवे गावच्या शिवारात अधिकारी अभिषेक भाऊसाहेब गोर्डे यांनी विना परवाना शेतातून वाळुचे उत्खनन करून वाळुची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला होता. मात्र पुढील कार्यवाही पार पाडत असताना आरोपींनी अधिकाऱ्यांना दमदाटी करून तो पळवून नेला.