शिवकालीन गडकोटांचे संवर्धन व स्वच्छता यासाठी ‘आपला मावळा संघटने’च्या वतीने प्रतापगडावर सहावी दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात मोठ्या संख्येने मावळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या मोहिमेदरम्यान किल्ल्यावरील झाडाझुडपं व कचरा हटविण्यात आला. तसेच पर्यटक व भाविकांना स्वच्छतेचा संदेश मिळावा यासाठी संघटनेच्या वतीने किल्ल्याच्या ठिकठिकाणी कचरा पेट्या व नामफलक लावण्यात आले.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची