कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी गावात सर्वपित्री दर्श अमावस्या व नवरात्रारंभ घटस्थापना पाडव्याचे औचित्य साधून बाजार चौक प्रांगणात मंगळवार (२३ सप्टेंबर) रोजी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जनजागृती लोककला कार्यक्रम व राष्ट्रीय संगीत दुय्यमचा खडा तमाशा धडाक्यात पार पडला. या भव्य तमाशामध्ये पंचरंगी निशान पार्टीचे शाहीरा उर्मिला चौधरी, कवडू शेंदुरकर, नकलकार गणेश भागेळकर, डान्सर हेमराज, छकुली, ढोलक मास्टर उपस्थित होते.