बीड शहरातील बार्शी नाका परिसरात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता हिना पेट्रोल पंपासमोर घडली.एमएच 12 एफवाय 6551 क्रमांकाच्या कारने दुचाकीला मागून धडक दिली. सुदैवाने दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली.अपघातानंतर नागरिकांनी कारचालकास ताब्यात घेतले असता, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.