उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा येथे महादेव मंदीराचे समोर ओठयावर मुलास मारहाण करीत असताना सोडवण्यासाठी गेलेल्या ७० वर्षे वयाच्या वयोवृद्ध महिलेस उचलून आदळल्याने वृद्धेच्या मनक्याला दुखापत झाली. याप्रकरणी शनिवारी २३ ऑगस्ट दुपारी साडेतीनच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,१५ ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास धोंडी हिप्परगा येथे आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या मुलास मारहाण करीत असताना वयोवृद्ध महिला भांडण सोडवण्यासाठी गेली होती