नंदुरबार तालुक्यातील बलवंड शिवारात प्रशांत साहेबराव पाटील हे आपल्या शेतात कोळपणी करीत असताना त्यांचे बैलांनी शेजारच्या शेतात ठिबक नळ्यांचे नुकसान केले. या कारणावरून रवींद्र पाटील यांनी प्रशांत पाटील यांच्याशी वाद घातले. या वादातून हाणामारी झाली. याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी रात्री नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात प्रशांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आणि रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.