विरार येथील मारंबळपाडा जेटीवर कारचा अपघात घडला आहे. रो- रो बोटीतून बाहेर येत असताना कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट समुद्रात कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही पोलीस आणि इतर प्रवाशांच्या मदतीने कार मधील दोघांनाही सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.