जालन्यात मनसेचे आंदोलन सुरू असतानाच कामाला सुरुवात! मनसेने मागणी केल्याच्या कामाची दखल घेत तत्काळ महानगर पालिकेच्या वतीने कामाला सुरवात. जालना:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना शहराच्या वतीने जालना शहरातील मस्तगड भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रस्त्याची झालेली दुर्व्यवस्था आणि सुशोभीकरण यासाठी मनसेने पालिकेच्या निषेधार्थ मस्तगड भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लक्षणीय धरणे आंदोलन सुरू केले होते व १४ एप्रिल म्हणजेच बाबासाहेबांचा जयंतीपूर्वी परिसरातील कामे मार्गी लावावे यासाठी आंदोलन केले व पालिकेने देखील तत्काळ या आंदोलनाची दखल घेत कामास सुरुवात देखील केली.