आमदाबाद (ता.शिरूर) परिसरातील आमदाबाद फाटा येथे शिरूर पोलिसांनी शुक्रवारी (ता.29) रात्री पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान दोघा आरोपींना दोन गावठी पिस्तूले आणि चार जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी अटक केली.तसेच चौकशी दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून आणखी एक गावठी पिस्तूल व सहा काडतुसे असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.