आज शनिवारी दुपारी २ च्या सुमारास मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती नंदू राहांगडाले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत होणार असून स्थानिक पातळीवर पक्षाला बळकटी मिळणार आहे, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. तसेच नवीन सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.