राहुरी तालुक्यामध्ये शनिवारी रात्रीपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. राहुरी शहरात अनेक भाग पाण्याखाली गेला तर कोंढवड- तांदूळवाडी मुळा नदीवरील पूल देखील पाण्याखाली गेल्याने पुलावरील वाहतूक ठप्प झाली तर पिंपरी वळण पुलाला देखील पाणी लागल्याने सावधगिरीचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलाय आहे. नदीपात्रात देखील 25 हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.