शहरात आलेल्या बिबट्याचा शोध अद्याप लागला नसून समजाध्यामांवर जुने व्हिडिओ पाठवून भीती निर्माण करण्याचे काम केले जात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वन विभागाने १९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता सिडको येथे केले. गेल्या चार दिवसांपासून शहरात बिबट्याचा वावर दिसून येतोय. गुरुवारी रात्री प्रोझन मॉल जवळ बिबट्या दिसल्या नंतर समाज माध्यमांवर इतर ठिकाणचे बिबट्याचे जुने व्हिडिओ टाकले जात आहेत. इतकंच नाही तर नाशिक येथील बिबट्या पकडण्याचा जुना व्हिडिओ सायंकाळी नागरिकांच्या मोबाईल वर आला.