दोन दिवसांपासून शहरात दिसत आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उल्कानगरीत 16 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता दाखल झाले. 2 पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ड्रोन कॅमेराद्वारे घनदाट झाडीत बिबट्याच्या पाहणीला सुरुवात झाली आहे. भटक्या कुत्र्याच्या शोधात बिबट्या आला असल्याची वनविभागाची माहिती देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी भागात सोमवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले होते.