राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई मंत्रालय येथे वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. ओ.पी. गुप्ता यांची भेट घेतली. या भेटीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला घरबांधणीसाठी डीजी लोन मंजुरीच्या प्रश्नावर आ. मुनगंटीवार यांनी सविस्तर चर्चा केली. या विषयाची दखल घेत अपर मुख्य सचिव श्री. ओ. पी. गुप्ता यांनी तातडीने यासंदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.