वर्धा जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. दिनांक ३० ऑगस्ट रोजी, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पथकाने अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक मोहीम राबवली. सायंकाळी सहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे या मोहिमेदरम्यान, समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी पारधी बेडा येथे 'वॉशआऊट' मोहीम राबवून मोठी कार्यवाही करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणाहून तब्बल १८ लाख २९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.