सोलापूर शहरातील आगामी गणेशोत्सव मिरवणुकीसंदर्भात महापालिकेने सर्व आवश्यक तयारी केली आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था तसेच पाणीपुरवठ्याची व्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी रविवारी सायं 5 वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग आणि मंडळ पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन केले गेले आहे.