शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट ला सायंकाळी 5:30 वाजता पासून रामटेक शहरात विविध ठिकाणी बैलाचा सण बैलपोळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. पावसाची रिपरिप सुरू असतानाही बैलपोळ्याचा उत्साह कायम होता. रामटेक शहरात न.प. प्रशासन रामटेक द्वारा मुख्यपोळा नेहरू मैदानात भरविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सायंकाळी 5:30 वाजता पासून बैलपोळ्याला सुरुवात करण्यात आली. नगरपरिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या हस्ते तोरणात उपस्थित बैल जोड्यांची पूजा करण्यात आली व भोजारा देण्यात आला.