मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे चोरट्यांनी दिवसाढवळ्या धुमाकूळ घालत दोन ठिकाणी घरफोडी केली. या घटनेत तब्बल ९ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. हा प्रकार १० सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडला. भजनदास केशव व्यवहारे (वय ६०, रा. आष्टी) यांच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, अज्ञात चोरट्यांनी घराचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला.