ग्रामीण आणि शहरी भागात क्रीडा संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास अलिबाग येथे मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास खासदार धैर्यशील पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले उपस्थित होते.