विरार येथे एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. विजयनगर रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळला आणि बाजूला असलेल्या चाळींवर पडला मारतीच्या ढिगार्याखाली जवळपास 15 ते 20 जण अडकल्याची भीती व्यक्त केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमनल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांच्यामार्फत बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. नऊ जणांना आत्तापर्यंत बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.