गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या 'श्रीगणेशा आरोग्याचा' या विशेष मोहिमेअंतर्गत 1015 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आली. 28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत मनपाच्या 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे 7 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.