काटोल तालुक्यातील खांणगाव येथे शेतीत सतत होत असलेल्या नुकसानीला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रफुल दादाराव नेरकर (वय ४१) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.प्रफुल नेरकर हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्यावर पत्नी प्रीती नेरकर (वय ३५) आणि मुलगा समर्थ नेरकर (वय ११) यांच्यासह संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती.