सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी मंगळवारी दुपारी २ वाजता पत्रकारांना माहिती दिली की गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात कृत्रिम तळ्यांची निर्मिती केली आहे. त्या तळ्यात पाणी सोडण्यात येत आहे. तळी भरुन घेण्यात येत आहे. प्रामुख्याने गोडोली येथील कल्याणी शाळेच्या शेजारी, सदरबाजारात दगडी शाळेच्या पाठीमागे, हुतात्मा स्मारक परिसरात, राजवाडा पोहणे तलाव, बुधवार नाका येथे विसर्जन तळ्याची सुविधा केली.