मराठा आरक्षण विषयी विषयी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकार कायम चर्चेच्या भूमिकेत असून या निर्णयाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी विचार करावा व सरकार बरोबर चर्चेची भूमिका घ्यावी असे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.