अमृत वृक्ष लागवड योजनेसह आपलं गाव आपलं झाड या उपक्रमांतर्गत फळबाग वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास कोच्छी येथे पार पडला. या उपक्रमात गावातील शेकडो नागरिकांनी सहभाग दर्शविला होता. या उपक्रमांतर्गत चिकू, आंबा, फणस, आवळा यासह अन्य फळांच्या झाडांचे वृक्षारोपण स्थानिक कोच्छी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा परिसरात करण्यात आले. एवढेच नाही तर लागवड केलेल्या वृक्षांचे गावकऱ्यांनी पालकत्व स्वीकारले.