पुरंदर तालुक्यातील सासवड येथे घरासमोर पार केलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी सासवड पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद सुयश भरत दसाडे यांनी सासवड पोलिसात दिली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच 12 यू डी 0525 ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत अधिकचा तपास सासवड पोलीस करत आहेत