पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीतून एक संताप जनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 22 ऑगस्ट ला घरकाम करणारी 50 वर्षीय महिला पायी जात असताना एका नराधमाने तिला थांबविले आणि घरकाम आहे तुम्हाला पाचशे रुपये देईल असं आमिष देत आरोपी तिला एका रिकाम्या अपार्टमेंट मध्ये घेऊन गेला आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला तसेच तिच्या पर्समधील साडेतीन हजार रुपये व 90 हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पसार झाला.