महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेविरोधात माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी सर्व १७ प्रभागांच्या आरक्षण विरहित रचनेबाबत तीव्र हरकत घेतली आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी या प्रभाग रचनेत कायद्याचे उल्लंघन, लोकप्रतिनिधीचा राजकीय दबाव आणि मागासवर्गीयासह सर्व आरक्षित समाजावर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी आपली हरकत जेष्ठ विधिज्ञ अभिजित पुप्पल यांच्यामार्फत नोंदवली आहे.