Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 3, 2025
आज दिनांक 3 ऑक्टोंबर सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे सडलेल्या कपाशी व मका पिकांचे तोरण बांधून तहसील कार्यालयाच्या गेटवर सरकारविरोधात आगळावेगळा निषेध व्यक्त केला. आमरण उपोषणाला बसलेले मंगेश साबळे यांच्या मागण्यांना पाठिंबा देत शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यांनी हा अनोखा आंदोलनात्मक प्रयोग केला असून, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासह ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.