बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयच्या बाजूला असलेल्या बीएसएनएलच्या जवळपास 350 फूट उंच टावरवर एक व्यक्ती चढल्याने प्रशासनात एकच खळबळ उडालेली आहे.येळगाव धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेली शेत जमिनीवर बुलढाणा नगरपालिकेकडून बांधकाम होत असल्याने सदर व्यक्ती भूमिहीन होणार असून हा बांधकाम त्वरित थांबवा या मागणीसाठी सदर व्यक्ती टावरवर चढल्याची माहिती समोर आली आहे.