वाळुज एमआयडीसी परिसरातील जोगेश्वरी जवळील नारळी बागेत 5 सप्टेंबर शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास मोकाट कुत्र्याने 17 वर्षे मुलाला चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली प्रज्ञेश अविनाश गायकवाड असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे दरम्यान या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला झाला असून यामुळे नागरिक भयभित झाले आहे ग्रामपंचायत ने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे