आज रविवारी दुपारी ३ च्या सुमारास एमसीए क्लब कांदिवली पश्चिम येथे उत्तर मुंबईचे खासदार, केंदीय मंत्री पियुष गोयल यांच्याद्वारे भाजपा उत्तर मुंबई 'सांसद खेल महोत्सवा'ची घोषणा करण्यात आली. हा भव्य महोत्सव येत्या २१ सप्टेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत व्यापक स्तरावर आयोजित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खेळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याच्या उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या खेळ महोत्सवाअंतर्गत जवळपास १ लाख खेळाडूंना सहभागी करणार आहे.