आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पवई येथे मानवतेसाठी मदत करणारे हात या ग्रुपच्या वतीने महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार मनोज कोटक यांनी उपस्थित राहून, गणेश विसर्जनासाठी प्रवास करणाऱ्या भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले. याप्रसंगी सुरेश अग्रवाल, अनिता सिंह, ट्रिपल एच ग्रुपचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने गणेश भक्त उपस्थित होते.