सांगली जिल्ह्यातील मांजर्डे (ता. तासगाव) गावात घडलेली एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी घरात खेळत असताना पाण्याच्या बादलीत पडल्याने एका वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यू झालेल्या मुलीचं नाव तन्वी शिवाजी कदम (घोटकर) (वय १ वर्ष) असं आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तन्वी घरात नेहमीप्रमाणे रांगत-खेळत होती. त्या वेळी आ घरकामात गुंतली होती. खेळताखेळता ती पाण्याने भरलेल्या बादलीत पडली