दिघेवाडी येथे हेडा परिवाराच्यावतीने दि. 06 सप्टेंबर रेाजी गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये विशेष आकर्षण म्हणून वृंदावन येथून आणलेल्या नृत्य कलाकारांच्या नृत्याचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी तसेच गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली असून, आकर्षक, मनमोहक व सुंदर असा पेहराव केलेले कलाकार हे महिला व लहान व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. जिल्हाधिकारी, जिल्हापोलिस अधिक्षक व इतर राजकीय नेत्यांनी सुध्दा या ठिकाणी भेट देवून नृत्याचा आनंद घेतला.