टाकळी वतपाळ हे जिगाव प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पुनर्वसीत गाव असून या गावात अजून सुद्धा नागरी सुविधांचे काम पूर्णपणे झाले नाही. प्रकल्पग्रस्तांनी अनेक वेळा संबंधित विभागाला निवेदन दिले परंतु कोणतीही कारवाई अद्याप पर्यंत झालेली नाही म्हणून या पुनर्वसन गावातील समस्या तात्काळ सोडवाव्यात यासाठी गावकऱ्यांनी प्रहार संघटनेचे माजी मंत्री बच्चू कडू यांना आज सात सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या मुख्य कार्यालयात जाऊन माजी मंत्री बच्चू कडू यांना टाकळी वतपाळ गावाची व्यथा सांगितल्या.