कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) उभारण्यासाठी कोपरगाव शहरात जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांची आ.काळे यांनी आज २७ सप्टेंबर रोजी बैठक घेतली. सदर उपकेंद्राच्या गरजेप्रमाणे लवकरात लवकर जागा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आ.काळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता धनंजयजी धांडे, सहाय्यक अभियंता अतुलजी खंदारे, दिनेशजी पंडोरे, पंकजजी मेहता, स