गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याचबरोबर वेगवेगळ्या समाजाचे मोर्चे, आंदोलने आणि मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. २१) सकाळी सांगवी येथील मोकळ्या मैदानात जमावबंदी हाताळण्याचा सराव (मॉक ड्रिल) केला. या सरावात गोळीबार, हातगोळे फेकणे, अश्रुधुर नळकांड्यांची चाचणी अशा सर्व उपाययोजना प्रत्यक्षात करून पाहिल्या.