संगमनेर प्रशासकीय भवनात शांतता समितीच्या बैठकीतच राडा; पोलिसांचा दादागिरीला इशारा! आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी दहा वाजता शहरातील प्रशासकीय भवनात शांतता समिती व गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रांताधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, मुख्याधिकारी रामदास कोकरे, तहसीलदार धीरज मांजरे आदी अधिकारी उपस्थित होते.